पोहरादेवी तीर्थक्षेत्र - बंजारा समाजाची काशी

पोहरादेवी तीर्थक्षेत्र हे बंजारा समाजासाठी काशी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी देशभरातून लाखो बांधव येथे दर्शनासाठी येतात.

समाजाच्या परंपरा, संस्कृती, संत-महंत, सुधारक, शुरवीर आणि राजकीय नेत्यांचा इतिहास जतन व्हावा व भावी पिढीला माहिती मिळावी, या उद्देशाने नामदार श्री. संजय राठोड यांनी पोहरादेवीचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला.

प्रधानमंत्री मोदी यांची बंजारा काशी पोहरादेवी भेट

प्रधानमंत्री मोदी यांच्या बंजारा काशी पोहरादेवी भेटीतील खास क्षण आणि समृद्ध बंजारा संस्कृतीचा उत्सव

व्हिडिओ लोड होत आहे...

विकासाची सुरुवात

1
2014

विकास आराखडा तयार

वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचा विकास आराखडा तयार केला.

2
03 डिसेंबर 2018

भूमिपूजन समारंभ

नंगारा म्युझियम व इतर कामांचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या उपस्थितीत झाले.

या वेळी समाजाच्या हितासाठी 21 मागण्या शासनासमोर ठेवण्यात आल्या.

सेवाध्वज व अश्वारूढ पुतळा

12 फेब्रुवारी 2023

सेवाध्वज स्थापना व संत सेवालाल महाराजांचा पंचधातूतील अश्वारूढ पुतळा अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

"एक दन समाजेसारू" व "सेवालाल बोलो पोहरागड चालो" या घोषणांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सेवा ध्वज स्थापना व संत श्री सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळ्यातील मान्यवरांचे मनोगत

अन्य प्रमुख मान्यवरांचे मनोगत
मा.श्री.एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री साहेब यांचे मनोगत

सेवा ध्वज स्थापना व संत श्री सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी विशेष संबोधन

DCM Fadanvis
मा.श्री.देवेंद्र फडणवीस

उप मुख्यमंत्री यांचे मनोगत

सेवा ध्वज स्थापना व संत श्री सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी श्री. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष संबोधन

DCM Fadanvis
मा.श्री.संजयभाऊ राठोड

अन्न व औषध प्रशासन मंत्री यांचे मनोगत

सेवा ध्वज स्थापना व संत श्री सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी मा.श्री.संजयभाऊ राठोड यांचे विशेष संबोधन

नंगारा म्युझियम – समाजाचे स्वप्न पूर्णत्वास

05 ऑक्टोबर 2024 - ऐतिहासिक दिवस

आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा म्युझियमचे भव्य लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री, संत-महंत व देशभरातून आलेले लाखो बांधव उपस्थित होते.

या वास्तूच्या निर्मितीसाठी रु. 397.74 कोटी इतका खर्च झाला.
प्रथमच देशाचे प्रधानमंत्री पोहरादेवी येथे आले - हा प्रसंग ऐतिहासिक ठरला.
"वेगो नंगारा चालो पोहरा" व "आजी एक दन समाजेसारू" या उद्घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

नंगारा म्युझियम उद्घाटन सोहळ्यातील मान्यवरांचे मनोगत

प्रधानमंत्री मोदी जी मनोगत
मा. श्री.नरेंद्र मोदीजी

पंतप्रधान यांचे मनोगत

नंगारा म्युझियम उद्घाटन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष संबोधन

अन्य प्रमुख मान्यवरांचे मनोगत
प्रमुख मान्यवर

अन्य प्रमुख मान्यवरांचे मनोगत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे

श्री संजयभाऊ राठोड मनोगत
मा. श्री.संजयभाऊ राठोड

संजयभाऊ राठोड यांचे मनोगत

या ऐतिहासिक प्रकल्पाचे मुख्य सूत्रधार यांचे हृदयस्पर्शी विचार

आजवरची उपलब्धी

17/21
मागण्या पूर्ण
397.74
कोटी रुपये खर्च
100%
आंतरराष्ट्रीय दर्जा
  • 2018 मध्ये मांडलेल्या 21 मागण्यांपैकी जवळपास 17 मागण्या पूर्ण झाल्या आहेत.
  • नंगारा म्युझियम हे केवळ एक इमारत नाही, तर समाजाचा इतिहास, वारसा आणि अभिमानाचे प्रतीक आहे.
  • हे संग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून समाजाच्या सांस्कृतिक जतनासाठी एक भक्कम पाऊल आहे.
  • श्री क्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील इमारतीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट इमारत पुरस्कार जाहीर.

पोहरादेवी - उमरी विकास आराखडा

श्री संत सेवालाल महाराज मंदिर

  • सुमारे 12,000 चौ. फूट क्षेत्रफळावर शुभ्र संगमरवरी दगडांतून 90 फूट उंचीचे भव्य मंदिर
  • मंदिराभोवती परकोट आणि चारही बाजूंनी भव्य प्रवेशद्वार
  • मंदिरासमोर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त खुले रंगमंच

सामकी माता मंदिर

  • मंदिरासमोर सभामंडप
  • यात्रेकरूंना थांबण्यासाठी भक्तनिवास
  • भोजनगृह, स्वयंपाकगृह, ओपन शेड व स्वच्छतागृहे यांसारख्या आधुनिक सोयी

जगदंबा माता मंदिर – पोहरादेवी

  • मंदिरासमोर सभामंडप
  • यात्रेकरूंना थांबण्यासाठी भक्तनिवास
  • भोजनगृह, स्वयंपाकगृह, ओपन शेड व स्वच्छतागृहे यांसारख्या आधुनिक सोयी

जेतालाल महाराज मंदिर

  • मंदिरासमोर सभामंडप
  • यात्रेकरूंना थांबण्यासाठी भक्तनिवास
  • भोजनगृह, स्वयंपाकगृह, ओपन शेड व स्वच्छतागृहे यांसारख्या आधुनिक सोयी

संत डॉ. रामराव बापू महाराज समाधी स्थळ

  • समाधी स्थळाचा विकास सुरु
  • भाविकांसाठी सुविधा उभारल्या जात आहेत

शासनाचा निधी

महाराष्ट्र शासनाने 326.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून युद्धपातळीवर काम सुरु आहे.
हे यश ना. श्री.संजय राठोड यांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे.