वनार्टी - वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था

वनार्टी संस्थेची स्थापना - शैक्षणिक क्रांती

बंजारा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी वनार्टी संस्थेची स्थापना

वनार्टी व्हिडिओ
1
08.10.2024

शासन निर्णय - वनार्टी स्थापना

बार्टीच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी स्वतंत्र वनार्टी संस्थेची स्थापना. बार्टी, अमृत, महाज्योती, सारथी यांसारख्या संस्थांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय.

वनार्टी बाबत शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रशिक्षण क्षेत्रे

IAS - भारतीय प्रशासन सेवा
IPS - भारतीय पोलीस सेवा
IRS - भारतीय महसूल सेवा
IFS - भारतीय परदेशी सेवा

उद्दिष्ट व परिणाम

राज्यातील बंजारा विद्यार्थ्यांना उच्च प्रशासकीय पदावर पोहोचण्याची मोठी संधी उपलब्ध करून देणे.

अपेक्षित परिणाम

वनार्टीच्या माध्यमातून समाजात आमूलाग्र बदल घडणार आणि नवी पिढी उच्च पदांवर पोहोचून समाजाचे नेतृत्व करेल.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

13.12.2023

शासन निर्णय

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर मदत देण्याचा निर्णय. रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

लाभार्थी संख्या

21,600
दरवर्षी लाभार्थी विद्यार्थी

शैक्षणिक शहरांनुसार आर्थिक मदत

₹60,000
मुंबई, नागपूर, पुणे
₹51,000
महसूली विभागीय शहर
₹43,000
इतर जिल्हे
₹38,000
तालुका ठिकाण
परिणाम

त्यामुळे वसतिगृह न मिळाल्यासुद्धा शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार.

सावित्रीबाई फुले आधार योजने बाबत शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतिगृह

समस्या

ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे शिक्षण वारंवार खंडित होत होते कारण कामगार कुटुंबे हंगामी स्थलांतरित होतात.

1
15.06.2021

प्रथम शासन निर्णय

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह स्थापनेचा प्राथमिक निर्णय.

2
10.01.2024

विस्तारित योजना

राज्यभरात 82 शासकीय वसतिगृहांची स्थापना करण्याचा निर्णय.

82
शासकीय वसतिगृह
हजारो
लाभार्थी मुले
संत भगवानबाबा वसतिगृह योजनेचे फायदे

हजारो मुलांना शिक्षणाची सुरक्षितता व संधी मिळणार आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही.

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजने बाबत शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

परदेशी शिष्यवृत्ती योजना - संख्येत वाढ

शिष्यवृत्तीची वाढीव संख्या

पूर्वीची मर्यादा 10 विद्यार्थी/वर्ष
दि. 11.10.2022 50 विद्यार्थी
दि. 30.10.2023 75 विद्यार्थी

पात्र विद्यार्थी

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आता परदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ शकतात.

विशेष नोंद: इंजिनीअरिंग, मेडिकल आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्राधान्य

स्वप्न साकार

सामान्य कुटुंबातील पाल्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होणार.

जागतिक दर्जाचे शिक्षण
परदेशी शिष्यवृत्ती योजने बाबत शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

परिपोषण अनुदान वाढ

16.08.2024

अनुदान वाढ निर्णय

स्वयंसेवी संस्थांच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दरडोई अनुदानात महत्वपूर्ण वाढ करण्यात आली.

पूर्वी

₹1,500
प्रति महिना

नवे

₹2,200
प्रति महिना
फायदे

यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न व दर्जेदार सुविधा मिळणार आणि त्यांचे आरोग्य व शिक्षणाचा दर्जा सुधारणार.

मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यावृत्ती योजना - MPDRS

वैयक्तिक स्वरूपाची राज्यातील, समाजातील पहिली व एकमेव योजना

बंजारा समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

दिग्रस दारव्हा व नेर मतदार संघातील पहिल्या २ टप्प्यांत ४०० विद्यार्थ्यांना मिळाली यशाची दिशा. दरवर्षी 1000 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, ऑनलाइन क्लासेस व अभ्यास साहित्य भेट.

आर्थिक सहाय्य

₹10,000
एक रकमी

पात्रता

१२ वी किंवा तत्सम परीक्षा
उत्तीर्ण
फायदे

बंजारा समाजातील हुशार, गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेमुळे आर्थिक सहाय्य, ऑनलाइन क्लासेस व अभ्यास साहित्य इ. मिळणार आणि त्यांच्या स्वप्नाला बळ मिळणार.