समाजाची संख्याबळ
ऐतिहासिक उपलब्धी
महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या जवळपास 1 कोटी, तर देशभरात सुमारे 12 कोटी आहे. परंतु समाजाच्या आराध्य दैवताची, संत सेवालाल महाराजांची जयंती अनेक वर्षे शासन स्तरावर साजरी होत नव्हती.
संकल्प आणि घोषणा
श्री.संजय राठोड पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून शपथ घेत असतांना त्यांनी "जय सेवालाल" अशी घोषणा केली. समाजाच्या या आराध्य दैवताचा गौरव शासनमान्यतेने व्हावा ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती.
शासन निर्णय
त्यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दि. 29/12/2017 च्या परिपत्रकाद्वारे संत सेवालाल महाराजांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात
15 फेब्रुवारी - संत सेवालाल महाराज जयंती साजरी केली जाते