बंजारा पुकार
क्रांतदर्शी, क्रांतिसिंह सेवालाल महाराज 'जाणजो, छाणजो, पचच माणजो'
आदिवासी गोर आहे; डेलकर अळी (समाजवाद) आज मातीचे समानते साहित्यिक लेखक यांना अत्यंत मांडतो; तर Racism (वर्णभेद) ही भेदभाव निर्माण करणारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे "BP" हे केवळ शब्द नसून समाजाच्या विचारांची दिशा ठरवणारे प्रवाह आहेत. कधी समानतेकडे नेणारे, तर कधी विषमता वाढवणारे.
खालच्या पातळीवर जाऊन बोलणे, त्यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दांत लिहिणे आणि त्या आडून क्रांतदर्शी क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांच्या विचारांवर घाला करणे ही गोर बंजारा संस्कृती नाही. ज्यांना आपल्या चार पिढ्यांची नावे कागदावर लिहिण्याची हिंमत नाही, ते सेवालाल महाराज यांच्या विचारांवर स्वयंसिद्धतेने प्रमाणित करून साहित्यिकांशी हीनपणे लिहितात. तसे ते बागतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यासाठी समाजासमोर सत्यता आणण्यासाठी या लेखाची एक मालिका सुरू केलेली आहे. येत्या महिनाभर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे गेल्या ७८ वर्षांनंतरचा गोर बंजारा जमातीचा प्रवास यावर सविस्तरपणे लिहून क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांच्या 'जाणजो छाणजो पचच माणजो' या विचारापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे.
लेख क्र. १ आदिवासी गोर बंजारा साहित्याचा आजवरचा
प्रवास!
आम्हाला "BP" (ism)
कळण्याइतपतचं शहाणपण
धार्मिक संदर्भात 'इझम' म्हणजे श्रद्धेवर आधारित विचारसरणी, जीवनपद्धती किंवा तत्त्वज्ञान होय. धर्म मुळात सहअस्तित्व शिकवत असला तरी देखील, जेव्हा तो 'इझम' बनतो तेव्हा तो कठोर चौकटीत अडकतो आणि माणूस विचारांपेक्षा नियमांचा अनुयायी बनण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी श्रद्धेचे तत्त्वज्ञानात रूपांतर होऊन माणसाच्या जगण्याला मर्यादाही घालू शकते. म्हणूनच विचारस्वातंत्र्य सहिष्णुता आणि मानवी मूल्ये जपणे आवश्यक ठरते. एवढे शहाणपण आणि अक्कल मला एका रात्रीत आलेली नाही. यासाठी पिढ्यान् पिढ्या खर्ची झाल्या. काही लेखणी आजही रात्रंदिवस त्यासाठी झिजत आहेत.
म्हणजे या सर्वांचा अर्थ समजून घेण्याइतपत शहाणपण (अक्कल ) एका रात्रीत आलेलं आपल्याला एका रात्रीत आलेले नाही!
"BP" (Ism) म्हणजे एखादी विशिष्ट विचारसरणी, सिद्धांत दर्शवणारा शब्द हा सामान्यतः शब्दाच्या शेवटी लावला जाणारा प्रत्यय असून, मराठीत त्याला 'बाद' असे म्हटले जाते (उदा. भांडवलशाही). "BP" हे एखाद्या ठराविक विचारपद्धतीचे, विश्वासाचे किंवा वर्तनशैलीचे प्रतिनिधित्व करते.
इझमचे मुख्य स्वरूप असे की, ते विशिष्ट विचारसरणी किंवा तत्त्वज्ञानाचे रूप असते. उदाहरणार्थ,
(भांडवलशाही) ही नफ्यावर आधारित आर्थिक व्यवस्था
नाही. ते अनुभव, संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांच्या प्रक्रियेतून हळूहळू विकसित झालेले आहे. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. आदिवासी गोर बंजारा साहित्याचा
आजवरचा प्रवास!
आदिवासी गोर बंजारा जमातीला गाव कुसात आल्यावर स्वतःचा घाम गाळल्याशिवाय कधीच काहीही मिळालेलं नाही. प्रत्येक कणासाठी झगडावं लागलं आहे. ना आम्हाला कधी विद्येची देवता पावली, ना आमच्या घरात धनासह लक्ष्मीने कधी पाऊल टाकलं. आम्हाला इथे फुकट काहीच मिळालेलं
नाही.
त्या देवी-देवतांनी मात्र प्रस्थापित आणि उच्चभूंच्याच दारी बास केला त्यांच्या घरातच कृपेची घागर भरली. आमच्यासाठी तर पाणीही सन्मानाने नव्हतं. तेही अंतर
राखून, ऑजळीनेच प्यावं लागलं. याहूनही भयंकर म्हणजे षडयंत्रपूर्वक आम्हाला विस्थापित करण्यात आलं, शोषित बनवलं गेलं आणि आमच्या हक्क व अधिकारांपासून जाणीवपूर्वक बंचित ठेवलं गेलं. कधी ऊसतोडी तर विटभट्टीवर आमचं रक्त कायम आमच्या पोटाची खळगी भरण्यात जळत राहीलं.
आदिवासी गोर बंजारा जमातीला साहित्याची फार मोठी परंपरा राहिलेली नाही. ब्रिटिशांच्या जाचक अन्यायामुळे व्यापार उध्वस्त झाल्याने आदिवासी गोर बंजारा जमात देशोधडीला लागली. ब्रिटिशांच्या आक्रमणाखाली
आपल्या व्यापाराला अद्ययावत
करण्यात अपयशी ठरलेला आणि दळणवळणाच्या पारंपरिक आधारावर उभा राहिलेला आदिवासी बंजारा कोसळला. गोर बंजारा जमातीमध्ये साहित्याची परंपरा फार मोठी नाही. अतिशय बोटावर मोजण्याइतके साहित्यिक आपल्याला पाहायला मिळतात. त्याची सुरुवात बळीराम हिरामण पाटील यांच्यापासून होते आणि नंतरच्या काळात तांडाकार आत्माराम कनीराम राठोड, प्रा. मोतीराज राठोड, प्राचार्य ग. ह. राठोड आणि भीमनीपुत्र मोहनजी नाईक यांच्यापर्यंत पोहोचते. या सर्व साहित्यिकांनी त्या त्या परिस्थितीत आपल्या वहिवाट परंपरा, मौखिक लडी, लॅगी, भजन, ढाबलो इत्यादींच्या म्हणजेच अनौपचारिक मौखिक परंपरेतून इतिहास आणि माहिती जमा करून लिहिण्याचा
माध्यमातून,
प्रामाणिक प्रयत्न केला. खरंतर
ही सुरुवात होती. परंतु आजही त्यांचे साहित्य वाचल्यावर समाजाप्रती लिहिण्याचा त्यांचा प्रामाणिकपणा ठळकपणे दिसून येतो. या सर्व साहित्यिकांनी परिस्थितीशी दोन हात करत मिळालेल्या अनुभवातून तुटपुंज्या साधनांच्या माध्यमातून गोर बंजारा साहित्याचा पाया उभा केला. खरंतर गोर बंजारा जमातीच्या साहित्याचा पाया रचला.
आदिवासी, मूलनिवासीच नव्हे तर इथला खरा भूमिपुत्र गौर बंजारा जमातीच्या व्यथा, वेदना, संघर्ष, संस्कृती, गोरबोली आणि संवैधानिक हक अधिकार यावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून या सर्वांनी वाचा फोडली.
स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या लेखणीला दिशा मिळाली. भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेले संविधानिक ह-अधिकार, शिक्षण आणि त्यातून हरवलेली गौरवशाली परंपरा, गोर संस्कृती आणि गोरबोली यांनी नवचैतन्य मिळवले.
यात खऱ्या अर्थाने भूमिका निभावली ती हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या शैक्षणिक चळवळीने वसंतरावजी नाईक साहेब यांच्या शैक्षणिक चळवळीने गोर बंजारा समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांत मोठी फळी निर्माण केली. ज्यामुळे न भूतो न भविष्यती अशी शैक्षणिक चळवळ उभी राहिली. यावर मी लेख क्रमांक २ मध्ये सविस्तर लिहिणार आहे.
शेकडो वर्षे व्यापारासाठी जंगलातून भटकंती करणाऱ्या आदिवासी गोर बंजारा जमातीला गावकुसाच्या आत आल्यावर शोषणाला सामोरे जावे लागले. समाजाच्या खालच्या उतरंडीत दबलेला आवाज आणि कोंडलेला श्वास गुदमरत कायम शोषित राहिला. आपल्या आणि अधिकारांपासून
हक
वंचित राहिल्यामुळे आदिवासी गोरबंजारा हिनवला गेला. अशा परिस्थितीतही त्यांनी लिहायला सुरुवात केली.
बळीराम
सुरुवातीला हिरामण पाटील यांनी 'गोर बंजारा समाजाचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून गोर बंजारा समाजाचा इतिहास आणि गोरसंस्कृती यावर लिहिण्याचा प्रयत्न केला. बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती आणि साहित्य यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. कदाचित त्यांच्या व्यतिरिक्त समकालीन साहित्यिक लेखकही असू शकतील.
यानंतर ७०-८० च्या दशकानंतर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरात बहुजनांची व्यापक चळवळ सुरू झाली आणि तिने जोर धरला. प्रस्थापित आणि उच्चवर्णीयांच्या विरोधात, ज्यांनी बहुजनांचे शोषण केले, त्यांच्याविरुद्ध ही चळवळ उभी राहिली. याचा परिणाम साहित्यिकांवर झाला आणि आदिवासी गोर बंजारा जमातीवर झालेला अन्याय, व्यथा आणि वेदना साहित्याच्या माध्यमातून समोर आल्या.
तांडाकार आत्माराम कनीराम राठोड यांनी या व्यथा-वेदनांचे चित्रण केले. त्यानंतर प्रा. मोतीराज राठोड यांनी गोरबंजारा इतिहास, संस्कृती, गोरबोली आणि वहिवाट यावर लेखन केले. प्रा. मोतीराज राठोड यांच्या नंतर प्राचार्य ग. ह. राठोड सर यांनी आदिवासी बंजारा जमातीचा संघर्षमय जीवनप्रवास इतिहास आणि भारतीय संविधानातून मिळालेले हक अधिकार यावर समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. त्याचसोबत भीमनीपुत्र मोहनजी नाईक यांनी गोरगणाचा गोरमाटी अर्थात गोर बंजारा संस्कृती, गोरबोली, परंपरा आणि वहिवाट यावर अतिशय मार्मिकपणे लेखन केले. त्यांनी गोरबोलीमध्ये सातत्याने लिखाण केले असून, आज वयाची ९० पार केल्यानंतरही
ते अविरतपणे कार्यरत आहेत. हा त्यांचा प्रामाणिकपणा, जिद्द आणि समाजप्रबोधनाचा अखंड प्रवास आहे. त्यांनी कोणतेही पद, पदवी किंवा लाभ न पाहता 'पे बॅक टू सोसायटी' या टू भावनेतून कार्य केले आहे. अशा साहित्यिकांचा अपमान करणे ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे.
एकूण या सर्व साहित्यिक, लेखक आणि विचारवंतांनी आदिवासी गोर बंजारा जमातीच्या संस्कृती, वहिवाट, परंपरा, गोरबोली, वेशभूषा आणि चालीरीती यांचे संवर्धन करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या लिखाणामुळेच समाजाचे संवैधानिक हक्क आणि अधिकार यांची जाणीव निर्माण झाली. त्यांच्या स्वाभिमानाने आणि विद्वत्तेने मी प्रभावित आहे. हे सर्व साहित्यिक माझ्यासाठी अत्यंत आदरणीय आहेत आणि माझी लेखणी त्यांच्या विचारांतूनच घडलेली आहे.
अशा या साहित्यप्रवासात सर्वात मोठे योगदान हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांचे राहिले आहे. त्यांच्या शैक्षणिक चळवळीमुळे समाजामध्ये मोठा बदल घडला आणि विविध क्षेत्रांत सक्षम
व्यक्ती घडल्या. आज आम्हाला जी काही 'एझम' कळते, त्याचे मूळ वसंतरावजी नाईक यांच्या
शैक्षणिक चळवळीतच आढळते... काही तथाकथितांना स्वतःच्या कर्तृत्वावर बदल घडवण्यापेक्षा आपल्या पूर्वजांवरच ('बापजादें' वर ) प्रश्नचिन्ह उभे करून त्यांची बदनामी करण्यातच पटाईत असतात. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, तेवढंही मान्य न ठेवणं हीच त्यांच्या विचारांची मर्यादा आहे.
प्रा. डॉ. गजानन लालसिंग जाधव
प्रागतिक विचार मंच

33 वाचन
0 पसंती